Maha Food Bharti 2026 : महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात वाहन चालक शिपाई पदांसाठी मेगा भरती प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहे.
पदसंख्या
- एकूण – 8 रिक्त जागा
पदांचा तपशील
- वाहनचालक – 1 जागा
- शिपाई – 7 जागा
वयोमर्यादा
- या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे व मागासवर्गीय उमेदवाराचे वय 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण
- संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची सुरुवातची तारीख
- 14 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 28 फेब्रुवारी 2026 असणार आहे.
शैक्षणिक पात्रता Maha Food Mumbai Bharti 2026
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
वित्तीय सल्लागार व उपसचिव, ८ वा मजला, गोकुलदास तेजपाल संकुल इमारत, लोकमान्य टिळक मार्ग, मंबई – ४०० ००१.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी व पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत
- उमेदवाराला मराठी भाषा बोलता येणे आवश्यक आहे.-**
- नेमणूक करण्यात येणारा उमेदवार हा किमान माध्यमिक शालांत परीक्षेत शंभर गुणाचे प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय उच्चस्तर किंवा निम्नस्तर उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
उमेदवाराजवळ प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ हलके/जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. - उमेदवार निर्व्यसनी असावा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसावा.
- उमेदवाराने अर्जामध्ये आवश्यक ती सर्व माहिती अचूक नमूद करायची आहे, चुकीची माहिती आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक देखील अचूक नमूद करायचा आहे.