Close Visit MahaNews12

उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे बंपर भरती, त्वरित अर्ज करा !!

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2026 : उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर 23 फेब्रुवारी 2026 रोजी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.

पदांचा तपशील

  • वैद्यकीय अधिकारी
  • सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
  • फिजिशियन
  • प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ
  • बालरोगतज्ञ
  • नेत्ररोगतज्ज्ञ
  • त्वचारोगतज्ज्ञ
  • भौतिकशास्त्रज्ञ
  • ईएनटी तज्ञ

पदसंख्या (Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2026)

  • एकूण 42 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण

  • उल्हासनगर ठाणे
अर्ज करण्याची पद्धत
  • ऑफलाइन

निवड प्रक्रिया

  • या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

मुलाखतीची तारीख

  • 23 फेब्रुवारी 2026.

मुलाखतीचा पत्ता

  • वैद्यकिय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका,वॉर रूम, दुसरा मजला.
शैक्षणिक पात्रता
  • या भारतीय प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

पगार Ulhasnagar Municipal Corporation

  • उमेदवाराला पगार हा 30000 ते 60000 पर्यंत पदांनुसार देण्यात येणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  • उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्र प्रमाणे अचूकपणे नोंदवायचे आहे, अर्जासोबत माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
  • उमेदवार शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा.
  • अर्ज स्वीकारण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवाराची निवड झाली असे नाही निवड प्रक्रियेदरम्यान कोणत्याही वेळी किंवा उमेदवाराच्या निवडीनंतर अर्जदार विहित अर्हता धारण करीत नसल्याचे किंवा कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवाराची निवड तात्काळ रद्द करण्यात येईल.
  • अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक भरावी, एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • पदभरतीच्या आवश्यक त्या सूचना व सुधारणा वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.
  • उमेदवारांवरा कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
  • उमेदवाराने पूर्ण भरलेल्या अर्जाची स्वसाक्षंकित प्रत व सर्व कागदपत्रे उल्हासनगर महानगरपालिका वॉर रूम, दुसरा मजला येथे दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उपस्थित रहावे,उशिरा येणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
  • वरील पदे ही केवळ कंत्राटी स्वरूपाची असून उमेदवारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा, सेवा संरक्षण मिळवण्याचा अथवा नियमित सेवेचा कोणताही दावा करता येणार नाही.
PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

 

Leave a Comment