All India Radio Mumbai Bharti 2026 : प्रसार भारती- प्रादेशिक वृत्त विभाग, आकाशवाणी मुंबई मधील विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन ई-मेलद्वारे तसेच ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- हंगामी वृत्तसंपादक तथा वार्ताहर (मराठी)
- हंगामी वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार
- हंगामी वार्ताहर (इंग्रजी)
नोकरीचे ठिकाण
- यामध्ये नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
वयोमर्यादा All India Radio Mumbai Bharti 2026
- या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्ष जास्तीत जास्त 50 वर्षांपर्यंत असावे.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवाराने अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज शुल्क
- सामान्य श्रेणी- 354/-
- अनुसूचित जाती/जमाती/ओबीस- 266/-
अर्ज करण्याची तारीख
- उमेदवारांनी अर्ज 30 मार्च 2026 ते 13 एप्रिल 2026 पर्यंत सादर करायचे आहेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
- उपसंचालक, प्रादेशिक वृत्त विभाग, पहिला मजला, मुंबई न्यू ब्रॉडकास्टिंग हाऊस, बॅकबे रिक्लेमेशन, एच.टी. पारेख मार्ग, आमदार वसतिगृहासमोर, चर्चगेट – ४०० ०२०.
अर्ज पाठवण्याचा ईमेल पत्ता
शैक्षणिक पात्रता Akashvani Prasar Bharti Mumbai
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तसेच पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचायचे आहे.
- वृत्तवाहिनी रेडिओ माध्यमातील अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
- बातमी पत्र तयार करण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे.
- महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक परिस्थितीचे पुरेसे ज्ञान असावे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच ऑफलाइन तसेच ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज सादर करायचे आहेत.
- मुंबई महानगर क्षेत्रात राहणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि डिमांड ड्राफ्ट सादर करायचा आहे.
- अपूर्ण कागदपत्रे, अपात्र उमेदवारांचे अर्ज बाद केले जातील.
- लेखापरीक्षा, मुलाखत, प्रशिक्षण किंवा निवड यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही (टीए/डीए )
- उमेदवारांनी डिमांड ड्राफ्टसह पूर्ण भरलेला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक कागदपत्रांसह पीडीएफ स्वरूपात ई-मेल आयडी वर पाठवायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- पदभरतीचे इतर सर्व अधिकार All India Radioकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
FAQ
1.ही भरती कोणासाठी आहे?
हंगामी वृत्तसंपादक तथा वार्ताहर (मराठी), हंगामी वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार, हंगामी वार्ताहर (इंग्रजी). या पदांकरिता होणार आहे.
2.किती पदांसाठी भरती आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे.
3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे
4.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
अर्ज ऑनलाईन/ई-मेलद्वारे पद्धतीने सादर करायचे आहेत.