Close Visit MahaNews12

अरे व्वा ! गॅसला नवीन आणि सोपा आणि स्वस्त पर्याय आला, सहज मिळे असा | LPG gas crisis

LPG Gas crisis : अमेरिका आणि इस्राईल व इराण यांच्यातील युद्धामुळे क्रूड ऑइल आणि गॅस (Alternate for LPG) चा तुटवडा (Crude oil shortage) संपूर्ण भारतात जाणवत आहे, CNG आणि LPG गॅस सुद्धा महाग झाले आहेत आणि वेळेवर मिळत सुद्धा नाहीत अश्यावेळी गृहिणीची खूप धावपळ होत आहे म्हणून त्यावर सध्या मार्केट मध्ये उपलब्ध असलेले पर्याय आम्ही सांगण्याचा प्रयत्न या पोस्टमध्ये केला आहे.

गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे आणि काहीवेळा होणाऱ्या तुटवड्यामुळे पर्यायी स्वयंपाकाच्या साधनांची (Alternate for Cooking) गरज वाढली आहे. खाली गॅसशिवाय स्वयंपाक करण्यासाठी 5 उत्तम पर्याय दिले आहेत.

गॅसशिवाय स्वयंपाकासाठी अनेक पर्याय (Alternate options for gas cylinder) उपलब्ध आहेत. आपल्या गरजेनुसार आणि बजेटनुसार योग्य पर्याय निवडल्यास खर्च वाचवता येतो आणि पर्यावरणालाही मदत होते त्यामुळे याचा वापर करणे उपय्क्त ठरणार आहे.

1. इलेक्ट्रिक इंडक्शन कुकर (Electric Induction Cooker) :

इंडक्शन कुकर हा आजकाल सर्वात लोकप्रिय पर्याय आहे खालील कारणामुळे ते वापरण्यास अधिक सोईस्कर पडेल.
✔ वीजेवर चालतो
✔ जलद आणि सुरक्षित
✔ तापमान नियंत्रण सोपे

तुम्ही फ्लॅट मध्ये राहत असाल किंवा लहान कुटुंब असेल तर हा पर्याय फार उपयोगी पडेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

2. इलेक्ट्रिक हॉट प्लेट (Electric Hot Plate) :

ही साधी आणि स्वस्त इलेक्ट्रिक शेगडी आहे यासाठी घरातील कोणतेही भांडे वापरू शकतो आणि लवकर स्वयंपाक करू शकतो. हे बॅकअप म्हणून खूप उपयोगी पडेल.

✔ कोणत्याही भांड्यात वापरता येते
✔ वापरण्यास सोपी
✔ कमी किमतीत उपलब्ध

3.सोलर कुकर (सौर उर्जा) (Solar Cooker) :

सूर्याच्या उर्जेवर चालणारा पर्यावरणपूरक पर्याय म्हणून तुम्ही सोलर कुकर चा पर्याय निवडू शकता भात, डाळ, भाजी शिजविण्यासाठी याचा चांगला फायदा होऊ शकतो.

✔ इंधन खर्च शून्य
✔ प्रदूषणमुक्त
✔ ग्रामीण भागासाठी उत्तम

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

4. बायोगॅस प्लांट (Biogas Plant) :

घरगुती कचऱ्यापासून तयार होणारा गॅस म्हणून बायोगॅस कडे पाहिले जाते घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती करून त्याचा वापर तुम्ही दैनंदिन गरजांसाठी करू शकता, एकदा केलेली दिर्घकालीन गुंतवणूक म्हणून बायोगॅस प्लांट लावू शकता.

✔ स्वस्त आणि टिकाऊ उपाय
✔ शेती किंवा मोठ्या घरांसाठी योग्य
✔ पर्यावरणास अनुकूल

5. लाकूड / चुल (Traditional Stove-Chulha) :

चुलीवरची स्वयंपाक करण्याची पारंपरिक पद्धत आजही ग्रामीण भागात वापरली जाते आणि शहरामध्ये चुलीवरचे जेवण खाण्यासाठी नागरिक खूप लांब- लांब जातात त्यांना घरी असे जेवण मिळत नाही आणि इतर जेवणामध्ये चुलीवरच्या जेवणाची चव लागत नाही. हे सहज उपलब्ध होणारे इंधन आहे मात्र धूर आणि प्रदूषणाचा विचार करणे आवश्यक आहे. फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्हाला हा स्वस्त पर्याय वापरता येणार नाही.

✔ वीज किंवा गॅसची गरज नाही
✔ सहज उपलब्ध इंधन

वरील पाचपैकी कोणताही पर्याय तुम्ही स्वयंपाकासाठी वापरू शकता यातील काही पर्याय स्वस्त आहेत तर काही पर्याय परवडणारे नाहीत, जो पर्याय तुम्हाला व्यवस्थित वाटेल त्याचा वापर तुम्ही करू शकता.

Leave a Comment