Mahavitaran Bharti 2026 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीचे नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक ते सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत,महावितरण अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
पदांचा तपशील
- अभियांत्रिकी पदवीधारक – 49
- अभियांत्रिकी पदवीधारक – 13
- वाणिज्य पदवीधारक – 16
अर्ज करण्याची पद्धत
- पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
वयोमर्यादा (Mahavitaran Bharti 2026)
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता
- मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा संसदेच्या नियमाप्रमाणे अधिकृत केलेले संस्थेकडून पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
- कला/वाणिज्य शाखेतील पदवीधर उमेदवार एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
वेतन (Mahavitaran Bharti 2026)
- प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा राहील, प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना नियमाप्रमाणे विद्यावेतन पदवीधर उमेदवारांना 9000 व पदवीधारक उमेदवारांना 8000 दरमहा अदा करण्यात येईल.
कागदपत्रे Mahavitaran Nashik Apprentice Bharti 2026
- उमेदवारांनी आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- जात वैधता प्रमाणपत्र
- दहावी बारावी गुणपत्रक
- पदवी/पदवीका परीक्षा उत्तीर्ण असल्याचे अंतिम वर्षाचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
- इतर सर्व मूळ कागदपत्रे
नोकरी ठिकाण
- नाशिक.
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Mahavitaran)
- 05 मार्च 2026.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- दहावी बारावी गुणपत्रक, पदवी/पदवीका परीक्षा उत्तीर्ण असल्याचे अंतिम वर्षाचे गुणपत्रक व प्रमाणपत्र आणि इतर सर्व मूळ कागदपत्रे व त्यांची साक्षांकित छायांकित प्रत कागदपत्रे पडताळणी तसेच सोबत आणणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यापूर्वी NATS पोर्टल वर नोंदणी करून इनरोलमेंट आयडी नमूद करणे बंधनकारक आहे.
- वरील प्रमाणे दर्शविलेल्या पदांमध्ये बदल करण्याचा अधिकार माननीय मुख्य अभियंता यांना आहे.
- प्रशिक्षण संपल्यानंतर शिकाऊ उमेदवारांना कंपनीचे सेवेत सामावून घेणे बंधनकारक नाही याची नोंद घ्यावी.
- निवड झालेल्या उमेदवारांची यादी नाशिक परिमंडळ कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येईल.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत.
- उमेदवाराने अर्ज जाहिरातीत दिलेल्या लिंक वरूनच ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे इतर पद्धतीने आलेल्या अर्ज विचारात घेतली जाणार नाहीत.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज रद्द केले जातील.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्या उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |