Close Visit MahaNews12

10वी, 12वी व पदवीधर उमेदवारांसाठी एसटी महामंडळामध्ये मेगा भरती सुरु! | MSRTC Bharti 2026

MSRTC Bharti 2026 : एसटी महामंडळामध्ये नोकरीची संधी मिळविण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी हि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी हि भरती आयोजित करण्यात आली आहे.

या भरती करीत ऑनलाईन अर्ज सादर करायचे असून त्याची लिंक व इतर माहिती खाली नमूद केलेली आहे. नागपूर व भंडारा जिल्ह्यामध्ये हि भरती राहणार आहे त्याकरिता तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून अर्ज सादर करू शकणार आहेत.

पदांचा तपशील :

अभियांत्रिकी पदवीधर, पदविका धारक व आयटीआय शिकाऊ उमेदवार

एकूण रिक्त जागा : –

शैक्षणिक अर्हता व इतर निकष

या पदभरतीसाठी विविध पदानुसार शिक्षण दर्शविण्यात आले असून सर्व उमेदवाराने 10 वी+आयटीआय,पदवीधर व पदविका धारक  असणे आवश्यक आहे, इतर अर्हतेसाठी खाली दिलेल्या मूळ जाहिराती वाचाव्यात.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष व कमाल 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीयांसाठी वयामध्ये शिथिलता देण्यात आलेली असून त्यांचे वय जास्तीत जास्त 43 वर्ष असावे.

RTE प्रवेश 2026 ची प्रक्रिया सुरु; ऑनलाईन अर्जाचे वेळापत्रक जाहीर | RTE Admission 2026

अर्जाचे शुल्क

उमेदवाराने अर्ज केलेल्या आस्थापने नुसार त्या जिल्ह्याची जाहिरात वाचून त्यामध्ये दिलेल्या नावाने धनाकर्ष काढावा हा धनाकर्ष मागास वर्गांसाठी आणि इतर वर्गांसाठी 590 रुपये असेल तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती साठी 296 रुपये असावा.

अर्ज पद्धती

उमेदवाराने ऑनलाईन अर्ज दिनांक 03 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करायचे आहेत, खाली लिंक दिलेली त्या लिंकवरून तुम्ही अर्ज सादर करू शकता.
अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची प्रिंट, धनाकर्ष व खाली नमूद केलेली कागदपत्रे घेऊन जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर जमा करावेत.

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. आयटीआय चे प्रमाणपत्र व सर्व सत्रांचे गुणपत्रक
  3. जन्मतारखेची शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचे प्रमाणपत्र
  5. इतर आवश्यक कागदपत्रे.

ठाणे महानगरपालिकेत 21 जागांसाठी नवीन भरती सुरु;पगार 30,000 रुपये | Thane Mahanagarpalika Bharti 2026

पगार

या पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला शासन निर्णयाप्रमाणे विद्यावेतन देण्यात येणार असून हे वेतन शासन आणि परिवहन महामंडळ या दोघांमार्फत दिले जाईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी आणि अर्ज सादर करावा व त्या सर्व प्रक्रिया पार पाडाव्यात. जाहिरातीमध्ये दाखविल्या व्यतिरिक्त कोणतेही वेगळे शुल्क विद्यार्थ्याने कोणालाही देऊ नये हि भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून कोणत्याही एजंट द्वारे हि पदे भरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी व कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये.

PDF जाहिरात  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

FAQ

प्रश्न 1 : एकूण किती जागा आहेत?
उत्तर : रिक्त जागांची माहिती जाहिरातीमध्ये वाचावी.

प्रश्न 2 : कोणत्या पदांसाठी भरती आहे?
उत्तर : अभियांत्रिकी पदवीधर, पदविका धारक व आयटीआय शिकाऊ उमेदवार

प्रश्न 3 :शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर : 0 वी+आयटीआय,पदवीधर व पदविका असणे आवश्यक आहे.

प्रश्न 4 :अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर : ऑनलाईन अर्ज 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करता येतील.

प्रश्न 5 :अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर : मागास व इतर वर्गांसाठी ₹590, तर SC/ST उमेदवारांसाठी ₹296 आहे.

Leave a Comment