South Central Railway Bharti 2026 : रेल्वेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी !! दक्षिण मध्य रेल्वेत शिकाऊ उमेदवारांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरूनच दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- शिकाऊ (अप्रेंटिस)
पदसंख्या
- एकूण – 2801 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी कमीत कमी दहावी उत्तीर्ण+ आयटीआय/डिप्लोमा कोर्स असणे आवश्यक आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा
- तर यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 15 वर्षे व जास्तीत जास्त 24 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
8वी पासवर भारतीय डाक विभागात विविध पदांसाठी बंपर भरती
अर्ज शुल्क South Central Railway Apprentice Bharti 2026
- अर्ज शुल्क म्हणून खुल्या प्रवर्गासाठी – 100 /-
- SC/ST/PWD/महिला साठी – कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.
निवड प्रक्रिया
- यामध्ये उमेदवाराची निवड ही मेरिट लिस्ट नुसार होणार आहे.
अर्ज पद्धती SCR Apprentice Bharti 2026
- उमेदवाराने अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 12 मार्च 2026 असणार आहे.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 11 एप्रिल 2026, रात्री 23:59.
- अधिकृत वेबसाईट – https://scr.indianrailways.gov.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही तसेच इतर पद्धतीने आलेले अर्ज देखील रद्द करण्यात येतील.
- उमेदवारांनी अर्ज सादर करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची ठरल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- भरतीचे इतर सर्व अधिकार रेल्वे विभागाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |