Thane Mahanagarpalika Bharti 2026 : ठाणे महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, बेलापूर रोड, कळवा, ठाणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत, ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आवश्यक सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
पदांचा तपशील
- मानसेवी वैद्यकीय तज्ञ
पगार Thane Mahanagarpalika Bharti 2026
- यामध्ये उमेदवाराला पगार दरमहा पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहे.
पदसंख्या
- एकूण – 51 रिक्त जागा
वयोमर्यादा
- उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 64 वर्षापर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे.
मुलाखतीची तारीख
- उमेदवाराची मुलाखत 04 मार्च 2026 ते 5 मार्च 2026 या कालावधीत
मुलाखतीचा पत्ता TMC
- अधिष्ठाता कार्यालय, पहिला मजला, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय या ठिकाणी सकाळी 11.00 वाजता होणार आहे.
- उमेदवारांनी मुलाखतीला येताना शैक्षणिक अरहतेची व इतर आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रति व मूळ प्रतिसंह उपस्थित राहायचे आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना Thane Municipal Corporation
- उमेदवारांनी पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास मुलाखतीला दिलेल्या तारखेस उपस्थित राहायचे आहे.
- दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही.
- मुलाखतीदरम्यान उमेदवारांजवळ कागदपत्रे नसल्यास अशा उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही.
- उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी दिलेली माहिती कागदपत्रांमध्ये चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल
- या पदाकरिता उमेदवारांना महानगरपालिकेत करारनामा करावा लागेल.
- या पदाकरिता उमेदवाराला रुग्णालयामध्ये आठवड्यातून एक दिवस दोन ते तीन तास याप्रमाणे महिन्यातून चार वेळा रुग्णालयास सेवा द्यावी लागेल.
- ठाणे महानगरपालिकेचे इतर आर्थिक फायदे लाभ देय राहणार नाहीत दिले जाणार नाहीत, सदरचे तज्ञ ठाणे महानगरपालिकेचे कायम कर्मचारी असणार नाहीत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |