Close Visit MahaNews12

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र येथे शिपाई,लिपिक व इतर पदांकरिता मेगा भरती | Pani Puravtha Vibhag Bharti 2026

Pani Puravtha Vibhag Bharti 2026 : पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत राज्य पाणी व स्वच्छता मिशन बेलापूर, नवी मुंबई या कार्यालयाकडून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

पदांचा तपशील

  • प्रकल्प व्यवस्थापक
  • उप व्यवस्थापक
  • उप व्यवस्थापक (IMIS)
  • भूजल तज्ञ, स्वच्छता व आरोग्य सल्लागार
  • उप अभियंता
  • शाखा अभियंता
  • उपलेखापाल
  • सहाय्यक
  • लिपीक
  • शिपाई

पदसंख्या WSSO Maharashtra Recruitment 2026

  • एकूण – 22 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
  • या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

अर्ज पद्धती 

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 20 मार्च 2026

ऑफलाइन अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • राज्य पाणी व स्वच्छता मिशन, पहिला मजला, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई – ४०० ६१४.
शैक्षणिक पात्रता
  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदानुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचायची आहे.
पगार  Pani Puravtha Vibhag Bharti 2026
  • या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना पगार हा सरकारच्या सातव्या वेतन आयोगानुसार देण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 20 मार्च 2026 ही शेवटची मुदत असणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना 
  • संबंधित संवर्गात इच्छुक किंवा पात्र उमेदवार न मिळाल्यास लगतच्या निम्न संवर्गातील श्रेणीमधील अर्हता व अनुभव पूर्ण करणाऱ्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचा संबंधित पदावर प्रतिनियुक्तीसाठी विचार केला जाईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांना त्यांचे नाव मागे घेता येणार नाही.
  • उपरोक्त भरती प्रक्रियेची अंतिम अधिकार माननीय अभियान संचालक जलजीवन मिशन यांचे राहतील.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

Leave a Comment