Security Guard Board Maharashtra Bharti 2026 : सुरक्षारक्षक मंडळ महाराष्ट्र अंतर्गत सुरक्षारक्षक पदासाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन नोंदणीद्वारे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- सुरक्षा रक्षक
पदसंख्या
- एकूण – 317 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
- नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा
शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (बारावी उत्तीर्ण) असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा Security Guard Board Maharashtra Bharti 2026
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- ऑनलाईन नोंदणीद्वारे
महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात नोकरीची सुवर्णसंधी त्वरित अर्ज करा
अर्ज शुल्क Security Guard Board Maharashtra
- खुला प्रवर्ग 100 रुपये व टॅक्स
- राखीव प्रवर्ग 75 रुपये व टॅक्स
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 28 मे 2026 सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत
उमेदवारांसाठी सूचना
- मैदानी परीक्षा दरम्यान काही अपघात झाल्यास अथवा अघटीत प्रसंग ओढवल्यास संबंधित मंडळ त्यास जबाबदार राहणार नाही याची अर्जदाराने नोंद घ्यावी.
- एका सुरक्षारक्षक मंडळातून दुसऱ्या सुरक्षारक्षक मंडळात बदली करण्यास सुरक्षा रक्षक पात्र असणार नाही.
- सुरक्षारक्षक 60 वयाचा पूर्ण होईपर्यंत सुरक्षारक्षक मंडळामध्ये कार्यरत राहील,त्यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुरक्षारक्षक म्हणून काम करता येणार नाही.
- ज्या आस्थापनेने सुरक्षारक्षक मंडळाकडे सुरक्षारक्षक पुरविण्याबाबत मागणी केली असेल त्या स्थापनेसाठी जमीन संपादित झाली आहे,अशा प्रकल्पग्रस्त कुटुंबातील घटकांच्या पात्र उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
- इच्छुक उमेदवारांनी तिसऱ्या व्यक्तीच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये किंवा संपर्क करू नये असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
- यापूर्वीच्या उमेदवारांनी सुरक्षारक्षकांच्या नोंदणी भरती करिता ऑनलाइन अर्ज केलेले आहेत त्यांनी देखील पुन्हा नव्याने अर्ज करणे अनिवार्य आहे याची नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
- वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.
| PDF जाहिरात | जाहिरात PDF 01
|
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
FAQ
1.सुरक्षारक्षक मंडळ महाराष्ट्र भरती 2026 कोणासाठी आहे?
सुरक्षारक्षक नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आहे.
2.शैक्षणिक पात्रता काय आहे?
मान्यताप्राप्त विद्यापीठातून उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (बारावी उत्तीर्ण) असणे गरजेचे आहे.
3.अर्ज कसा करायचा आहे?
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
4.अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
28 मे 2026 ही शेवटची तारीख आहे.