BMC Recruitment 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात सादर करायचे आहेत.
तरुणांना नोकरीची चांगली संधी मुंबई महानगरपालिके मध्ये उपलब्ध झाली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेली संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा. ही भरती प्रक्रिया ऑफलाइन होणार असल्याने उमेदवारांनी अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या तारखेत व दिलेल्या वेळेत सादर करायचे आहेत.
पदाचा तपशील
- विकृतीशास्त्रज्ञ (पूर्णवेळ)
- संपर्क अधिकारी
- माहिती तंत्रज्ञ
- परिचारिका
- क्ष-किरण तंत्रज्ञ
- वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (LOCUM) (प्रसूती रजेच्या कालावधीमध्ये).
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असल्याने, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
मासिक वेतन (Brihanmumbai Municipal Corporation)
- यामध्ये उमेदवाराला दरमहा 20000 ते 112000/- पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.
पदसंख्या
- एकूण – 07 रिक्त जागा
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 20 एप्रिल 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 04 मे 2026
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण
- मुंबई
अधिकृत संकेतस्थळ
अर्ज करण्याची पद्धत व कालावधी
- पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन भरून सादर करण्याचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
- महानगरपालिका CTC, PHO आणि BMT केंद्र, बोरिवली (पूर्व), मुंबई – 400066.
👉👉एसटी महामंडळामध्ये 17450 जागांसाठी बंपर भरती जाहीर👈👈
सर्वसाधारण अटी व सूचना
- अर्जावर स्वतःचे सध्याचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र स्वतःच्या स्वाक्षरीसह चिटकवण्यात यावे, स्वतःचा पोस्टचा पत्ता, पिनकोड क्रमांक सहित पूर्ण असावा आणि मोबाईल नंबर, ईमेल आयडी सह पूर्ण नमूद करण्यात यावा.
- जाहिरातीमध्ये दिलेली पदांची संख्या आवश्यकतेनुसार कमी करण्यात येईल.
- उमेदवारांनी स्वतः निश्चित करावयाचे आहे की ते आवेदित पदांच्या सर्व अर्हता व अटी पूर्ण करतात. उमेदवार विहित अर्हता व अटी पूर्ण करीत नसल्याचे कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करायचे आहेत.
- विहित नमुन्यातील अर्ज मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच रुग्णालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- उमेदवारांनी अर्जसोबत अर्ज शुल्क व सर्व बाबींची पूर्तता केलेले अर्ज सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रति, अलीकडेच काढलेले पासपोर्ट छायाचित्र त्यावर चिकटवून अर्ज दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेस सादर करायचा आहे.
- शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टी होऊन
- अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत,सदर प्रक्रिया कुठल्याही वेळी स्थगित करण्याचे अधिकार हे माननीय महानगरपालिका आयुक्त यांना राहतील यापूर्वी संबंधित कार्यालयात अन्य ठिकाणी सादर केलेले प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही व्यक्तीला व इतर दुसऱ्या संस्थेला अर्ज विकणे,स्वीकारणे इत्यादीचा अधिकार दिलेल्या नाही याची कृपया नोंद घ्यावी.
- टपालाने, कुरिअरने, ईमेलद्वारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत पत्र उमेदवारांच्या मुलाखती संबंधित ठिकाण, दिनांक व वेळ मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Question)
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑफलाइन अर्ज सादर करावेत.
3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 20000 ते 112000/- पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.